गोष्ट तिच्या भेटीची
गोष्ट तिच्या भेटीची अधूनमधून भेटीगाठी होत असतात पण ही भेट खास होती, कारण १५ वर्षांमध्ये प्रथमच तिने भेटूया का ? असं विचारलं होत (हो हो आहे एवढी जुनी मैत्रीण ) ह्या आधी नेहमीच मी विचारलेले होते. तिने विचारलं स्वतःहून ह्यातच सगळं आलं होत त्यात सुद्धा तिने सांगितले सुट्टीच्या दिवशी भेटू मस्त लंच करू आणि तू नको येउ इकडे मीच येते तुझ्या इथे. सगळं १५ वर्षातील एकदम भरून काढायचं ठरवलं होत वाटतं. हिला भेटताना कधी कपडे नीट नेटके आहेत ह्याचा विचार केला नाही (कधी कधी तर स्लीपर घालून दाट वाढलेले केस अश्या भयंकर अवतारात सुद्धा गेलो आहे ) पण ह्या वेळी विचार करावा लागत होता, कोणते कपडे घालू , शूज घालू कि सॅंडल, गॉगल सुद्धा सोबत घेऊया वारंवार तिला मेसेज करत होतो नक्की कित्ती वाजता भेटायच, कुठे भेटायचं जणू काही पहिलीच भेट आहे. ती अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत सांगते मी तुला असंच बोलत राहिली. भेटायचा दिवस उजाडला मी तिला म्हणालो होतो घरातून निघालीस कि मेसेज कर , पण सांगून ऐकणारी ती कसली, ठरलेली वेळ निघून गेली होती. मी घरी जेवण नको सांगून बसलो होतो. म्हंटल आज फजिती होते आहे. आता त...