वाढदिवस - Special Wishes

 

 वाढदिवस - Special Wishes


प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते कि त्याच्या/ तिच्या (Wish) शुभेच्छां  शिवाय वाढदिवस (Birthday) अपुरा असतो. मग ती कोणीही असू शकते वडील, बहीण,भाऊ,बायको,भाऊ,प्रियसी, प्रियकर ,मैत्रीण, मित्र (आई नाही लिहले कारण ती औक्षण करते).

तशीच काहीशी ह्या दोंघांची मैत्री म्हणजे वाढदिवसाला त्याच्या/तिच्या कडून शुभेच्छाचा मेसेजे नाही आला, कि वाढदिवस जणू काही झालाच नाही. अशी दोघांचीही अवस्था. पावसाची वाट पाहणाऱ्या चातक पक्षा प्रमाणे, म्हणजे नुसते मेसेज करून भागणारे नसते फोन सुद्धा करायला हवा तासंतास बोलायला हवे. कितीही मोठं भाडंणं झालेलं असलं तरी कोणाचीही चूक असली तरी वाढदिवसाच्या दिवशी फोन हा करावाच लागतो.

 तिचा वाढदिवस आला होता व तो विसरणे ह्याला तरी शक्य नव्हते. रात्री बारा पासून शुभेच्छा देण्याची एक पद्धत सुरु आहे (शास्त्र असेल कदाचित) त्यात काहींना मी पहिले Wish केले ह्याचा आनंद घ्यायचा असतो. ह्याचे मात्र असे काही नाही हा निवांत झोपी गेला होता (सूर्योदय नंतर ह्याचा दिवस सुरु होत असेल ).तिचा मोबाईल मात्र रात्री ११.५९ पासूनच खणखणू लागला असेल. मेसेजेचा वर्षाव सुरु झाला असेल, आहेच ती इतकी गोड तर शुभेच्छा देणाऱ्याची गर्दी होणारच. त्या गर्दीत त्याला हरवायचे नसेल म्हणून कदाचित तो झोपी गेला असेल. ती मात्र आनंदात सर्व शुभेच्छाना reply देत असेल. पण मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्या मेसेजची आतुरता सुरु झाली असेल दोन ते तिन वेळा मोबाईल उघडून पाहिला असेल त्याचे स्टेटस सुद्धा चेक केले असेल.

सकाळ झाली होती त्याने उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला आणि आपल्या मोबाईल गॅल्लरी मध्ये फोटो शोधू लागला. त्याला सुद्धा माहीत होते ती आपल्या मेसेजची वाट पाहत असणार. एक फोटो शोधून त्यांनी लगेच आपला WhatsApp स्टेटस अपडेट केला. (हो एकच फोटो २४/२४ फोटो नाही.) तिचा Reply येण्याआधी ह्याच्या Status चाहत्यांचे Reply येऊ लागले. ह्याला मात्र तिच्या पोचपावतीची ओढ लागली होती. ति स्टेटस पाहताच Reply येणार ह्याची शाश्वती होती. 

तिने स्टेटस पाहिले असणार फोटोत असलेल्या क्षणाचा विचार करत हसली असणार. वाढदिवसाच्या आनंदात अजून थोडीशी भर पडली असणार. पण तरीही तिच्या मनात त्याच्या फोनची अपेक्षा असणार. Status पाहून झालेला आनंद तिने reply मध्ये व्यक्त केला होता. प्रत्येक शब्द तिने खेचून लिहला होता. रोज पागल, मंद, वेडा म्हणून संबोधणारीने आज चक्क Dear लिहले. (तसे Dear लिहणाऱ्यांची त्याला कमी नाही ) आणि त्या पुढे Heart smiles. तिचा रीप्लाय पाहून ह्याचे मन सुद्धा आता शांत झाले होते. तो ही आज आनंदात होता. आता त्यांचे normal बोलणे सुरु झाले (म्हणजेच भांडण). 
त्याने मेसेज केला माझ्या मैत्रणीनी तुला Wish केले आहे. त्यावर तिझे उत्तर आता तू सर्वाना thank u बोल बरं हे तिने मिश्किलपणे म्हंटले असणार. शुभेच्छांची आतुरता संपली होती आणि ह्यांचे कधीही न संपणारे भाडणं परत सुरु झाले होते.

त्याला माहीत होते आज तिचा फोन व्यस्त (Busy) असणार तरी सुद्धा त्याने आठवण म्हणून नेहमीच्या वेळेवर तिला फोन केला होता. अपेक्षित असल्याप्रमाणे दुसऱ्या बाईचा आवाज "तुम्ही ज्याला संपर्क करू इच्छिता .. ..... एवढं ऐकुन त्याने फोन कट केला. तिचा सुद्धा काही पुन्हा फोन आला नव्हता किंवा ह्यांने सुद्धा परत केला नव्हता. पण कुठे तरी ह्याच्या मनात तिचा आवाज ऐकण्याचा ध्यास लागला होता. 

त्याला आठवण आली अरे Wish करायचे राहून गेले बराच उशीर झालेला एव्हाना ती घरी पोहचली असेल. फॅमिली सोबत Busy असेल. पण तरीही ह्याचे मन ऐकत नव्हते त्यांनी फोन केला. फोनची रिंग ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता कारण ह्यावेळी Busy Tone आली नव्हती. तिची Caller Tune 
 मेरे दिल मैं. जगाह खुदा की खाली थी , देखा वहाँ पै आज तेरा चेहरा है. 
मै भटकता हुआँसा एक बादल हूँ, जो तेरे आसमान पे आके ठेहरा हैं। 
प्रत्येक क्षणा क्षणाला ती फोन उचलेल असे त्याला वाटत होते. पण वेळ वाढत चाललेली सोबतच ह्याच्या मनातली आशा संपुष्टात येत चाललेली. Caller tune संपली होती त्यासोबतच आज बोलणं होईल हि आशा सुद्धा संपली होती. आज Birthday Wish करायचे राहून गेले हे मनात ठेवून. तो घरी निघून गेला. 

घरी पोहचता मोबाइल चार्जिंगला ठेवला आणि फ्रेश होऊन जेवायला बसला. जेवत असताना फोन वाजू लागला त्याला सुद्धा कळून चुकले होते हा फोन तिचाच असणार. त्याला सुद्धा मनोमनी वाटत होते. ती फोन करेल. तिला सुद्धा तेवढीच आतुरता होती. तिला सुद्धा ह्याच्याशी बोलायचंय होत. डोळे जेवणाच्या ताटात आणि कान मोबाईलच्या रिंगटोन वर ह्रदयाची स्पंदने थोडीशी वाढलेली त्या सोबत जेवणाचा वेग वाढलेला. फोन वाजून वाजून बंद पडला. पण तिला सुद्धा तेवढीच आतुरता होती माझ्याकडून Birthday Wish ऐकण्याची पून्हा फोन वाजू लागला. दोघांना एकमेकानांशी बोलायचे आहे पण वेळ जुळत नव्हती जेवणाचा वेग अजून वाढला. फोन सुद्धा आज नुसता वाजून वाजून दमला होता. आज बोलणे राहूनच गेले. मनात ही खंत होती. जेवण आवरून त्याने हात असेच कापड्याना पुसून मोबाईल चार्जिंग वरून काढला आणि मेसेज केला 
"Wish करण्यासाठी फोन केला होता" जेवत होतो तेव्हा तुझा कॉल आला " 
 instant reply "जेव मग " (कदाचित तिला फोनची अपेक्षा होती तिच्या रिप्लायवरून कळाले होते )
जेवूनच तुला मेसेज केला आहे ! . 
आणि पुढच्या क्षणात तिचा पुन्हा कॉल आला डिस्प्लेला तिचे नाव आणि फोटो पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आले होते. अखेर शेवटी त्याची शुभेच्छा देण्याची आणि तिची त्याचाकडून शुभेच्छा येण्याची इच्छा पूर्ण झाली होती. तिने धडाधड संपूर्ण दिवसाचे अपडेट द्याला सुरवात केली कोणी कोणी call केला. कोणी Surprise दिले, कोणी कसे celebration केले आणि काही राहिलेलं Celebration कसे करणार काय काय Plan आहेत सगळे सांगून मोकळी झाली.
तिच्या बोलण्यावरून असे वाटत होते तिला सुद्धा सर्व सांगायचे होते. ती सुद्धा त्याच्या फोनची तेवढ्याच आतुरतेने वाट पाहत होती.

जेवढी ती त्याच्यासाठी Special आहे, तेवढाच काहीसा तोही तिच्यासाठी Special आहॆ. माफक अपेक्षांमुळे मैत्री अतूट आहे.

Comments

Popular Posts