Unknown Call
Unknown कॉल
काल ऑफिस मध्ये असताना मोबाईल Vibrate होऊ लागला. Unknown नंबर होता (हल्ली Jio मुळे लोकांचे दोन, चार कितीही नंबर असतात) त्यामुळे Receive करावाच लागतो. (हो म्हणजेच उचलायला लागतो) . मला वाटले चाळीतून (म्हणजे आमची चाळ, तुम्हीं समजताय ती दगडावाली नाही ) कोणी तरी , विसर्जनाला येतो आहेस का ? हे विचारण्यासाठी फोन केला असणार. पण अंदाज साफ चुकलेला, कारण कोणतीही मुलगी मला विसर्जनांसाठी बोलवणार नव्हती.
फोन Receive करताच, मी Hello बोलायच्या आधी.
ती: निवेशा फायनास..... (ह्या नावाची कोणती कंपनी आहे का हे मला अजिबात माहीत नाही. मी केवळ फायनास ऐकून लगेच, थोडा ही विलंब न करता, उत्तर दिले )
मी: नाही करायची Investment ! (तिझे वाक्यपूर्ण होण्याआधी मी दिलेले उत्तर, कदाचित तिला अजिबात आवडले नव्हते. मुळातच तिच्या आवडी निवडीचा प्रश्न नव्हता. )
ती: मैने बोला क्या Investment करने को ? (आवाज गोड होता तिझा, त्यामुळे तिचे बोलणे टोचत नव्हते )
ती: सून तो लो पहिले क्या बोल रही वो (तिचा तेवर बदलेला होता, मी मात्र आपला हळूहळू हसत होतो.)
ती: मुझे सिर्फ फीडबॅक चाहिए था
ती: क्यू नही करना है ......... (तिने Investment बोलण्याआधी मी उत्तर दिले होते )
मी: (हसत हसत) पैसा नही हैं. ! (तिचा आवाज, तिचा बोलण्याचा टोन, इतका भारी असल्यामुळं मला हिंदी बोलणे भाग पडले.)
ती: पहिले इन्व्हेस्ट किया हुआ उसका क्या हुआ ? ( तिचा आवाज मधूर, पण तेवर कडक होत चालले होते. ती माझ्या इन्व्हेस्टमेंट बद्दल आणखी खोलात जाण्याआधी मी उत्तर दिले.)
मी : सब पैसा उड गया ! (आता तर तिला सुद्धा हसायला आले होते. तिने कसे बसे त्यावर कंट्रोल केला )
ती: ऐसे कैसे उड गया ? (आता आणखीन विषय गंभीर होण्यापेक्षा मी विषय बदलला)
मी: अरे मॅडम ! आज विसर्जन है ! आप भी जाओ , मुझे भी जाने दो !
ती: क्या ? (अगदी चिडून )
मला एका क्षणी वाटेल की मी मार्केटिंगवाला आहे आणि ती क्लायंट आहे. मी शांत बोलत होतो आणि ती चिडून.
मी: अरे आज गणपती का विसर्जन है ! मुझे जाना हैं आप भी जाओ थोडा मजा करलो !
ती: इतना Busy थे , तो फोन क्यू उठाया ! (आता तर हद्द पार केली तिने. एका क्षणी वाटले कोणी माझी फेसबुकवाली मैत्रीण तर नाही )
मी: वो Unknown नंबर था इसलिए उठाया ! (मला माझे हसू आवरत नव्हते )
ती: हा ठीक है ठीक है ! (फोन कट )
मी आणि माझा शेजारचा, फोन कट झाल्यावर जोर जोराने हसू लागलो.
खरंच तिझे बॉयफ्रेंड किंवा नवऱ्यासोबत भाडणं झालेले असेल का ? म्हणून कदाचित ती इतक्या रागात बोलत असेल. किंवा कामाचे प्रेशर असेल का ? टार्गेट्स पूर्ण झाले नसतील का ?
माझ्यापेक्षा तिला विसर्जन मिरवणुकीत जाणे गरजेचे होते. बेधुंद नाचून, ओरडून स्वतःचा राग दूर करता आला असता आणि त्या अथांग समृद्रात जाऊन आपल्या कामाच्या प्रेशरचे विसर्जन करता आले असते.
रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीचा त्रास होत असेल तर एकदा त्यात शामील होऊन पहा.
ढोल ताश्याच्या आवाजाने कानठळ्या बसत असतील तर एकदा त्यावर नाचून पहा.
घर आणि ऑफिसच्या अती कामामुळे उत्साह हरवून बसला असाल तर त्या गुलाल उधळणाऱ्या उत्साही लोकांसोबत आपली चिंता सुद्धा उधळवून पहा.
!! गणपती बाप्प्पा मोरया !!
पुढच्या वर्षी लवकर या ! आणि Investment साठी थोडे पैसे द्या!
Comments
Post a Comment