Cute चा आनंद कि .... दुःख

भाग २ - Cute चा आनंद कि .... दुःख  

बरेच दिवस काही लिहले नाही म्हणून काहीतरी लिहायले घेतले. ते वाचल्यावर तुम्हांला सुद्धा काहीतरीच लिहले आहे असे नक्की वाटेल. सततच्या सोशल साईट वापरामुळे फ्रेंड लिस्टमध्ये रोज नवनव्या फ्रेंडची भर पडत होती. मुळातच मुलांना सुंदर डीपी पाहिल्यानंतर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याचा मोह आवरत नाही. (मला तर नक्कीच नाही ) बरं प्रत्येकाची सुंदरतेची व्याखा वेगळी असते उगाच ह्या वरून वाद नको. 

असेच मेसेंजवर टेहाळणी करत असताना कोणीतरी नवीन फ्रेंड ऍड झाल्याचे लक्षात आले. Hi, Hello ने सुरवात करणारा मी नव्हे. मी माझ्यापद्धतीने चॅटिंगची सुरवात केली. मग तोच नेहमीचा प्रश्न गर्लफ्रेंड आहे का ? आणि नाही म्हंटल्यावर सुरवातीला मला खोटं ठरवणाऱ्या माझ्या मैत्रिणी. बरं हीच सर्व संभाषण (चॅटींग) इंग्लिश मध्ये आणि मी जय महाराष्ट्र मराठी मध्ये (शाळेत असल्यापासून  इंग्लिश कच्चे ), सुरवातीला मि सतत ऑनलाईन असतो हे सुद्धा बऱ्याचदा ऐकले आहे. पण हळू हळू तिला सुद्धा ऑनलाईन राहण्याची सवय झाली. गप्पा गोष्टी वाढल्या आणि त्या वाढायला लागल्या की टाईप करून बोटे दुखु लागतात मग वेळ येते नंबर एक्सचेंज करण्याची आणि मग फोनवर गप्पा (मला कंटाळा येतो जास्त वेळ फोनवर बोलायला ) पण तिला ते सोपे पडायचे म्हणून मग तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गप्पा होत होत्या.   

मग एका दिवशी भेटण्याचा मुहूर्त आला. चला भेटूया म्हटलं सिंगल असल्यामुळे शनिवारचा दिवस मी ऑनलाइन फ्रेंड्ससाठी देऊनच टाकालेला होता. बरं भेटायला येताना ती एकटी येईल असे गृहीत धरले होते. ती सोबत एक मस्तीखोर मुलाला घेऊन आली होती. हो तिच्याच मुलाला ( खूप मस्ती करत होता रस्त्यात) मी तर एक टप्पू सुद्धा दिला. लहान मूल तर असतातच Cute तसा तो सुद्धा, आई इतकी सुंदर तर मुलगा ही असणारच दोघांचा ड्रेसिंग सेन्स एकदम भारी (माझं म्हंटल तर हाताला लागतील ते कपडे करून निघायचे इस्त्री नसली तरी चालतं ) किती मस्ती करतो हा ? तर ती  म्हणाली घेऊन जातोस का ? (सर्व अशेच बोलतात पण पाठवत कोण नाही ) 

कितीवेळ अश्या रस्त्यावर उभे राहून गप्पा मारणार कुठेतरी बसून निवांत बोलू. एका हॉटेल मध्ये बसलो आप आपल्या आवडीचे पदार्ध ऑर्डर केले. मस्तीखोर मूल नुसतं इथून तिथून उड्या मारत होता. कधी आईच्या प्लेट मधले कधी माझ्या प्लेट मधले असे त्याचे खाणे चालले होते. त्याला सांभाळत सांभाळत आमचे खाणे आणि बोलणे चालू होते. ह्या मध्येच तो आपल्या आईच्या कानात जाऊन काही तर बोलला आणि माझ्याकडे  पाहू लागला आणि मैत्रीण सुद्धा हसू लागली. 

मी राहून राहून विचारले तिला ,काय जोक केला ह्यांनी ? तर ती काही नाही रे ! करून टाळत राहीली पण तिचा खोडकर मुलगा माझ्याकडे पाहून सतत स्माईल करत होता. मग मला राहवले नाही आणि मी तिला पुन्हा विचारले. 
 
काही नाही रे तो म्हणाला "मामा Cute आहे" आणि ती हसायला लागली !

आता मला कळत नव्हते Cute बोलला ह्याचा आनंद करू की मामा बोलला ह्याचे दुःख ?

पोरानं अगदी cute वाली स्माईल देऊन रस्त्यात दिलेल्या टप्पूचा बदला घेतला होता

म्हणून मी सर्व मैत्रिणीच्या मुलांना आणि मुलींना मला Sandy बोला असेच सांगतो. 

Comments

Popular Posts