ती म्हणते, पटलं ना ?

                    तिने त्याला मेसेज केला "Jadya" (जाड्या), त्याने अगदी शांतपणे तिला प्रतिउत्तर केलं "Hahaha" (हाहाहा..) तिला सवय नव्हती अश्या Reply ची त्यामुळेच कदाचित तिचे उत्तर येण्यास थोडा विलंब झाला होता. आता तिचा reply आला होता, "patl na" (पटलं ना ?) तिच्या त्या रिप्लाय वरून, तिनं ते हसून लिहलं असेल असा अंदाज त्याने संगणकापलीकडून मांडला होता. इथे तोही हसत होता. "पटलं ना " ह्याची बरीच उत्तर त्याच्याकडे होती पण, तो मात्र हसत राहीला आणि मनातल्या मनातच तिच्या प्रश्नाचे उत्तर शोधू लागला.
                   त्या दोघांची मैत्री फार जुनी (फार म्हणजे प्राचीन काळापासून नव्हे!) पण त्यांच्या मैत्रीबद्दल लिहायला घेतले तर मला कादंबरीच लिहावी लागेल. विषयांतर न करता आपण पुन्हा एकदा त्यांच्या "पटलं ना? " ह्या रिप्लायकडे वळूया. तिचे काहीही बोलणं त्याला पटायचे, कारण त्याला ती मनापासून आवडायची. त्याच तिच्या वर प्रेम आहे असं म्हणायला हि हरकत नाही. पण प्रेम म्हंटल की प्रत्येक जण आपआपली प्रेमाची व्याख्या वापरतो. मुलींसाठी प्रेम म्हंटल की ते राणा दा! सारखं लग्नाचं प्रेम (ह्या बाबत माझे गैरसमज असतील) आणि मुलांचे प्रेम म्हंटल की ? जाऊदे ह्या विषयावर न बोललेल बरं (ह्या बाबतीतही माझे काही गैरसमज असतील). आवडी पेक्षा प्रेम ह्या शब्दाचे वजन नेहमीच थोडं जास्त भरते म्हणून प्रेम म्हंटल.
                  ती त्याला कधी "जाड्या","मंद","पागल","नालायक", कधीतरी त्याच्या टोपण नावाने, हो त्याचे मूळ नाव कदाचित ती विसरली असेल.(तशी ती विसरण्यातली नाही) बरं त्याचे काही वेगळं नव्हत तो सुद्धा अशीच काही विशेषण वापरायचा तिच्यासाठी.मुळात दोघांची गट्टी जमली होती. प्रेमात सगळंच पटतं असत आता हे तिला कोण सांगणार. त्यामुळे तिच्या "पटलं ना ? " ह्या रिप्लायला त्याच्याकडे स्मितहास्याशिवाय इतर काही उत्तर नव्हतं. तिचा मेसेज येणे हेच भरपूर असतं त्याच्यासाठी मग त्यात तीनं काहीही म्हणूदे ह्याला नेहमीच ते गोडं वाटत (पटतं ) असत. जसा तो तिच्या मेसेजच्या प्रतीक्षेत असतो तसंच काहीही ती संगणकापलीकडून त्याच्या मेसेजची वाट पहात असेल. पहिला मेसेज त्यांनी करावा अशी तिची अपेक्षा असेलं, तितकाच हाही अपेक्षीत कि ! तिचा पहिल्यांदा मेसेज आला तर कुठं बिघडतंय. ह्या एकाच कारणावरून त्या दोघांचे एकमेकांशी बोलणं होत नाही. बाकी न बोलण्याने दोघांची अवस्था तशीच,त्यामुळे बऱ्याचदा तो पुढाकार घेऊन बोलतो आणि काही वेळेस तीही, पण तिच्या आवडण्यात व ह्याच्या आवडण्यात फरक नक्की असेल, कारण ह्याच्या बोलण्याने ती नेहमी चिडते, हा मात्र ती काहींही बोलू दे ... त्याच्या मनाला ते पटलेलं असतं.

Comments

Post a Comment

Popular Posts