तिच्या शोधात - Finding Her
मला तिचे नाव, फोन नंबर माहित नाही.फोटो सुद्धा नाही. तिच्याच शोधात आहे मी. २००४ ची गोष्ट आहे मी सिद्धार्थ कॉलेज (आनंद भवन फोर्ट) प्रवेश द्वाराच्या गॅलरी मध्ये मैत्रिणी सोबत गप्पा मारत उभा होतो. ती उभी राहण्याची जागा मुळीच नव्हती तिथं उभं राहून टवाळकी करणाऱ्यांचे ओळखपत्र (ID Card) स्वतः प्रिंसिपल काढून घ्यायचे. मला मात्र त्याची भीती नव्हती त्यांच्यासाठी मी एक हुशार विध्यार्थी होतो. (बारावी HSC ला चुकून कॉलेज मधून दुसरा आलेलो आणि पहिल्याने कॉलेज सोडल्यामुळं त्यांच्यासाठी मीच पहिला होतं ) बरं स्वतःची तारीफ राहूदे बाजूला. तर तिथे उभं असतांना कॉलेज च्या प्रवेश द्वारामधून दोन जणांचा प्रवेश झाला. मुलगा असल्यामुळं माझे डोळे CCTV प्रमाणे प्रवेशद्वाराकडे वळाले होते. त्या दोघीही सुंदर त्यांना पाहताच त्या भटुकड्या (भटुकड्या म्हणून कोणालाही दुखवायचे नाही आहे.) परंतु त्यांची ती पांढरी शुभ्र नितळ कांती पाहून हा शब्द मुखातून बाहेर पडल्या खेरीज राहत नाही. त्यातल्या एकीने साडी नेसलेली असल्यामुळे, ती हया मुलीची आई आहे असा प्रथमदर्शनी निष्कर्ष काढला.आणि माझें डोळे पुन्हा माझ्या मैत्रिणी कडे फिरले मला माहित नाही कदाचित तिने सुद्धा माझे ते CCTV प्रमाणे फिरणारे डोळे पाहिले असतील आमच्या गप्पा पुन्हा सुरु झाल्या.
पुढील ७ ते ८ सेकंदात कानावर एक सौम्य सोजवळ मधुर आवाज पडला "Excuse Me", माझी भटुकड्याची शंका खरी ठरली इतक्या सौम्य आणि मधुर आवाजात तेच बोलतात. तो "Excuse Me" माझासाठी असल्यामुळं तो अजूनच गोडं वाटतं होता. ती अतिशय सुंदर, हो माझ्या मैत्रिणीपेक्षा ही. तीने माझ्या मैत्रिणीला विचारलं नव्हतं त्यामुळे त्या तिघांचे CCTV माझ्या वर केंद्रित झाले होते. "Excuse Me" सिद्धार्थ कॉलेज ........ .. ? वाक्य पूर्ण होण्याआधीच मी " हो! डाव्या हाताला म्हटंल". पुन्हा. ती उच्चारली "Law कॉलेज" पुन्हां एकदा वाक्यपूर्ण होण्याआधी 3rd floor लाआहे ते.... आणि प्रिंसिपल ऑफिस ग्राउंड फ्लोअरला आहे. मी तिला कॉलेजचा पूर्ण Map सांगून मोकळा झालो. तीन आणि तिच्या आईनं एक स्मितहास्य देत Thank you म्हणून कॉलेज मध्ये प्रवेश केला. परंतु माझ्या मेंदू मध्ये तिच्या सोंदार्याचे रिपीट टेलिकास्ट चालू (मला अजूनही तिचा तो गुलाबी रंगांचा ड्रेस आठवतो) अचानक अजून एक सुंदर आवाज कानावर पडला "गेली ती आता", मैत्रिणीचा आवाज सुंदर होता पण स्वर मात्र चिडका लागलेला.त्यामुळं माझे रिपीट टेलिकास्ट संपुष्ठात आलेलं. "जितकं विचारलं तितकच सांगावं " अजूनही मैत्रिणीचा स्वर तोच होता हळू हळू तिला मधुर स्वर गवसू लागला आणि गप्पा सुरूच राहिल्या.
अर्ध्या तासाच्या अवधी मध्ये त्या दोघी म्हणजे ती आणि तिची आई परतीच्या मार्गी असताना मी अजूनही तिथेच गप्पा रंगवत उभा होतो. त्या गुलाबी ड्रेसमधील मुलीने जाताना पुन्हा एकदा स्मित हास्य दिलं आणि मला तर नेहमीच दात काढायची सवय मी ही एक गोड हास्य दिलं. तीच सोंदर्य इतकं होत की वातावरणात गोडवा पसरलेला असं मला तरी जाणवत होत. ती पुन्हा एकदा "Thank You" म्हणाली. मीही चटकन विचारून मोकळं झालो. "झाले का तुमचे काम ?", ती हसूनच म्हणाली "नाही ! उद्या लागणार आहे लिस्ट " , चला उद्या सुद्धा कॉलेजचे वातावरण प्रसन्न होणारं, मी मनातल्या मनात म्हंटल. तो पर्यंत ती तिथून निघून गेलेली व मैत्रिणीच्या लेक्चर ची वेळ झालेली असल्यामुळं ती सुद्धा निघाली.
दुसऱ्या दिवशी तिथेच ती मुलगी पुन्हा दिसली ह्यावेळेस मी एकटाच होतो. कालच्यासारखंच स्मित हास्य देऊन तीने कॉलेज मध्ये प्रवेश केला होता.परत निघत असताना कॉलेजच्या बाहेर ति माझ्यासमोर आली होती. मी पुटपुटलो "झालं का ऍडमीशन " ? , मान हलवत होकार देत ती हो ! म्हणाली. ती तिच्या वाटेवर व मी कॉलेज मध्ये निघून गेलो. ती आजही अगदी छान दिसत होती.
कॉलेज च्या पहिल्या मजल्यावर एक चहाची टपरी, टपरी च्या उजव्या हाताला गुहेत असेलेली कॉम्पुटर लॅब BSC साठी स्पेशल, टपरी च्या पाठी मागे लॅबर्री कॉमर्स वाल्यांसाठी इथं ती येण्याचे काहीही चान्सेस नव्हते. पण लॅबर्री च्या बाजूला असेलेली कॉमन रूम (CR) मुलींसाठी इथं ती कधी आली तर आपली भेट होईल.
ती चहाची टपरी आमच्या ग्रुप ची भेटण्याची व नोटबुक्स ठेवण्याची जागा.. ती एकदा दुसऱ्या मजल्या वरून जिने उतरत असताना तिला पहाताच आमच्या ग्रुप मधील एक मुलगा म्हणाला "कोण रे ही ? ", मी विलंब न करता "अरे... लॉ कॉलेजची आहे". सर्व मित्रांचे डोळे माझ्याकडे वळले. मी काही गुन्हा केला आहे असं वाटू लागले, आमचा चेअर सम्राट (तिथं एक चेअर ठेवलेली त्या वर गादी , नेहमीच त्या चेअर वर बसणारा तो मित्र म्हणजे चेअर सम्राट ) अगदीच तुचक्या भावनेने म्हणाला तुला बरं रे..... माहित. तो पर्यंत ती सुंदरी शेवटच्या च्या पायरी वर पोहोचली होती. मी गप्प रहाणे पसंद केले, ती नेमकी गर्ल्स कॉमन रूमकडे येत होती वाटेत मी आणि माझे मित्र सगळे अगदीच शांत.. तिनं विचारलं "इथे का उभा राहिला आहेस तू ? " एव्हाना मित्रानां कळालेलं असणार तिला पाहताच मी का लॉ कॉलेज म्हंटल होत. मी तिला म्हणालो, काही नाही ! चहा घेतो आहे तू घेणार का ? ती नाही म्हणाली आणि निघून गेली.पुढं मित्रांचे प्रश्न आणि माझी उत्तर.पुन्हा पुन्हा त्या टपरी वर तिची भेट झाली पण आता तिचे प्रश्न बदलेले होते, लेक्चर अटेंड करतो की नाही ? अभ्यास करतोस ना ? पास व्हायचे आहे ना ? दरवेळी वेगवेगळे अभ्यासाचे प्रश्न आणि माझे उत्तर एकच "हो"
२००४ ते २००५ ह्या दोन वर्षात बऱ्याचदा भेटलो ओळख ही झाली तिनं नाव सुद्धा सांगितलं होत, पण मी तेही विसरलो. कुठे तरी उपनगरात राहणारी होती बहुतेक मालाड, मला आता नक्की आठवत नाही. मोबाईल नव्हता त्यावेळेस माझ्याकडे, ना घरी landaline फोन. तिचा नंबर मागायची माझी कधी हिम्मत झाली नाही. तिला अभ्यासापलीकडे कधी काही बोलण्यासाठी असत असं मला तरी वाटत नव्हत. म्हणून एकदा तिच्या कडे तिच्या जुन्या नोट्स बद्दल विचारलं तर ती म्हणे मी आर्ट्सला होती मला इकॉनॉमिक्स स्पेशल विषय होता.
१२ ते १३ वर्ष उलटली आहेत . ती advocate झाली असेल. तीच लग्न सुद्धा झालं असेलं.. मला अधून मधून तिची आठवण येते, पण मला तर तीच नाव सुद्धा माहित नाही. म्हणून तिचा शोध घेण्यासाठी हे लिहलं आहे कदाचित ती इंटरनेट आणि सोशल मीडिया चा वापर करत असेल. मी तिला इंटरनेट च्या माध्यमातून शोधण्याचा पर्यन्त करत आहे.

Nice
ReplyDeleteछान
ReplyDeleteNice
ReplyDelete