ती मी आणि रिमझिम पाऊस
ती मी आणि रिमझिम पाऊस
तुम्हांला आता अतिशोयक्ती वाटेल मुबंईतला असून मी एकदाही जुहू चौपाटी (Juhu Beach) पाहिली नाही. तिच्या निमित्ताने तरी मला मुंबईतील न पाहिलेली ठिकाण पाहता येत आहेत. नशिबात गर्लफ्रेंड नसल्यामुळे हल्ली सायकलचा सगळ्या चौपाट्या फिरवत आहे.बांद्रा फोर्ट नंतर जुहूला जाण्याचा विचार केला. २० ते २५ मिनिटांत जुहूला पोहचण्याचा विचार केला. रस्त्यावरील खड्डे, मेट्रोची कामे सुरु असताना ही माझा वेग कमी होत नव्हता म्हणुनच माझ्या वेगाला आवार घालण्यासाठी चक्क डिसेंबर महिन्यात आज स्वतः वरुण देव पृथ्वीवर अवतरले.रिमझिम पावसात सायकलची सैर करताना मजा येईल ह्या आनंदातच जोरजोरात पेडल मारले. डांबरी रस्ते मस्त चकचकीत दिसत होते. पण ते चकचकीत दिसणारे रस्ते किती घातक आहे हे ब्रेक लावल्यावर कळाले. ब्रेक दाबल्यावर सायकल स्किट होत आहे हे लक्षात आल्यावर थोडं दमा दमाने जाण्याचा ठरविले.माहीमला येताच टर्न घेताना एक activa वाला घसरून पडला. बाईकपासून थोडं दूरच राहिलेले बरं अश्या पावसात जुहूला पोहचेपर्यंत तीन activa घसरून पडल्या होत्या. बांद्रा लिंकिंग रोड पासून रस्ते अगदीच कोरे करीत मग काय पुन्हां लावला जोर विमानाचा आवाज ऐकून जुहू चौपाटी जवळ आल्याचे कळालं. कपाळ वरून घामाच्या धारा टपकत होत्या मोबाईल काढून वेळ चेक केला ३६ मिनिटांत जवळपास १३ किमी अंतर पार झाले होते.
चर्नीरोड सारखा काही फील नाही आला. अगदीच छोटा रस्ता चर्नीरोड इतका भला मोठा रस्ता नव्हता. मला थोडेसे प्रभादेवी ते दादर चौपाटीचा फील आला. समुद्राला भरती होती नेमके सायकलिस्ट पण runners आणि joggers ह्यांनी चौपाटी भरलेली होती आणि त्यांची नजर बीचवर आलेल्या सायकलवर नक्कीच पडत होती. त्यात माझी सायकल जरा Cute च दिसते (म्हणजे मित्राची आहे) . इतर सायकलवाले सुद्धा एखादी नजर मारून जातात. मी सायकल मध्ये beginner असलो तरी थोडीशी acting जमल्यामुळं बऱ्याच जणांना थॊडा जाणता सायकलिस्ट वाटतो. मस्त एका हातात हेल्मेट घेऊन दिमाखात वाळूत सायकल लावली जिथे अगदीच कोणी नव्हते अशा ठिकाणे त्यामुळेच बरेंच जण सायकलकडे पाहत होते. मग म्हंटल थोडं तिचे फोटो काढावे तितक्यातच बाजूला असलेला एक सायकल चालवणारा मुलगा आला "मैं निकालू क्या फोटो" मी मनात म्हंटले नेकी औरं पूछ पूछ मी ऍडव्हान्स मध्ये थँक्स म्हणत त्याला होकार दिला. मित्राने छान फोटो काढले.
तो गोरेगाव वरून आला होता (मूळचा हैद्राबादचा ). मी मुंबईत राहून पहिल्यांदा इथे आलो असं म्हंटल्यावर त्याला सुद्धा हसू आवरले नाही. नरिमनपॉइंट बेटर है या जुहू ? त्याच्या ह्या प्रश्नाला मी क्षणाचा विलंब न करता एक मोठी स्माईल देऊन नरिमनपॉइंट भाई. त्याला एका Jogger ने सायकलिंग बद्दल विचारले असते तो सुद्धा म्हणाला. मी नवीन आहे पण हा बऱ्यापैकी फिरला आहे. मी मनातल्या मनात म्हणतो आहे माझा सुद्धा तिसराच आठवडा आहे. त्यात आणखीन एक सायकलिस्ट येऊन भेटला सेन्ट्रल रेल्वेचा ऑफिसर मग एकामेकांना नाव विचारले असता. तो हैद्राबादचा मुलगा थोडासा हिचकचत होता मी पुन्हा विचारले आपका नाम "आसिफ मोहमद्द". कदाचित ह्यामुळे तो हिचकचत असेल.
मी त्याला थोडीशी App बद्दल माहिती दिली आणि मिलते है कभी नरिमनपॉइंट मैं. निघता निघता त्याच्या मनात पेडरोड हिलची भीती घालून निघालो. घरी येताना मस्त वेगाने सायकल हाणू म्हणत निघालो पण बांद्राला पोहोचताच रिमझिम पावसाची सुरवात तेच काचेसारखे रस्ते अधे मध्ये केव्हाही कुठेही थांबणाऱ्या रिक्षा ह्यामुळे मीच वेग कमी केला. डोळ्यासमोर सकाळी पडलेले Activa चालक दिसत होते. बांद्रा आणि माहीम मधील फरक हा रस्त्याने सुद्धा ओळखता येतो. चिखलाने माखलेले आणि मिसळवर तरी येते तशी रस्त्यावर ऑइल पेट्रोल डिझेलची तरी आली होती. पाठीवरची बॅग चिलखलाने माखली इतकी सुंदर सायकल पाहून चिखलाचे थेंब तिच्यावर येऊन बसू लागले. आता तर मी अगदीच हळू चालवू लागलो होतो. ब्रिज खालून सुखे रस्ते शोधता मी येऊन घरी पोहोचलो. सायकलची दशा अगदीच खराब मित्राची असली तरी तिला टापटीप ठेवायला हवी. स्वतः आंघोळीला जायच्या आधी सायकलाच आंघोळ घातली. एक एक छोट्यातला छोटा चिखलाचा ठिपका पुसून काढला.
ती नेहमी सारखी cute दिसायला हवी ना !
Comments
Post a Comment