Last Seen

Last Seen

Social Site मुळे खूप साऱ्या (जरा जास्तच ) मैत्रिणी झाल्या आहेत. काहींशी रोज बोलणे होत असते, तर काहींशी अधेमध्ये म्हणजे हिरवी Light दिसली (Online) तरच लोक मेसेज करता. हिरवी light नसेल (Offline ) तर मेसेज करणारे फारच कमी आहेत. ह्या सर्व फ्रेंडमधली एक माझी  Online Friend आहे.तुम्ही म्हणाल ह्यात काय विशेष, १0 ते ११ वर्षांपूर्वी Social Media वर ओळख झालेली अजूनही मी तिला Online Friend म्हणतो आणि तिला त्याची खूप चीड येते.

रोज बोलणे होत नसले तरी रोज DP पहाणे (किती वेळा हे तिझे तिलाच माहीत) मी कधी कधी चांगला असेल तर १०० वेळा पहातो आणि Last Seen बघणे. म्हणजे  Last Seen update होत असेल, तर आहे तो खुशाल ! आणि मी ही तसेच समजतो. नेहमी नेहमी पहिला मेसेज करणे मला जमत नाही. २ आठवड्यातून कधी तरी एकदा बोलणे ती सुद्धा भांडणे, एकमेकांना चिडवणे. महिन्यातून एखादा तासभर फोन, कारण तेवढा वेळ सुद्धा कमी पडतो. एकमेकांच्या स्टेटस आणि फोटोला कमेंट्स न देणे, दोघांची तीच सवय.

काही दिवसांसाठी माझा फोन बंद होता. WhatsApp, फेसबुक (FB) बंद असल्यामुळे थोडी शांती मिळाली. सर्व ऑनलाईन (Online) फ्रेंडसाठी मी ऑफलाईन (Offline) झालो होतो. पूरग्रस्त भागात जसा एका गावाचा दुसऱ्या गावाचा संपर्क तुटतो त्याचप्रमाणे माझाही Facebook आणी WhatsApp वरील मित्र/मैत्रिणीचा संपर्क तुटला होता. कोणाचे फोन नाहीत ! कोणाचा मेसेज नाही ! तीन दिवस शांतता लाभली असता. WhatsApp चे  Last Seen तीन दिवसापुर्वीचे दिसल्यामुळे चौथ्या दिवशी Ring वाजली, टेन्शन घेणाऱ्यातील ती नव्हे, पण थोडे मन बैचेन झाले असेल म्हणून तिने कॉल केला असणार. मला हे अपेक्षित होते कारण आमची ती सवय आहे. Online असून १५ ते ३० -३० दिवस बोलायचे नाही.पण तीन चार दिवस Social Site वर Active न दिसल्यास काळजी पोटी आम्ही फोन करतो. रोज बोलणे नसले तरी ह्याच कारणामुळे आमची मैत्री टिकून राहिली आहे.

नवीन फोन घेतल्या नंतर स्वतःहुन सर्वाना मेसेज केला, पण तिझाच रिप्लाय सर्वात भारी होता.
"Was missing u Pagal"  हा खरंच ती Miss करत असणार. आणि पुन्हा आमची भाडणं सुरु झाली. Online असेन नसेन, हि माझी मैत्रीण नेहमीच माझी आठवण काढेल. १0 ते ११ वर्षांपूर्वी Social Media वर झालेली मैत्री टिकवण्यात माझ्यापेक्षा तिनेच जास्त पुढाकार घेतला. आमच्या मैत्रीला तिने नाव दिले आहे "
पागलपंती" मी मात्र तिला नेहमीच Online Friend बोलतो.

ह्या पुढेही आपली मैत्री कायम राहील. मी Online नाही दिसलो तर तू मला Miss करशील आणि काळजी पोटी फोन सुद्धा करत राहशील. आपली ही पागलपंती अशीच चालू राहील अशी अपेक्षा करतो.

उगाच जास्त चांगले लिहले तिच्याबद्दल तर हरबऱ्याच्या झाडावर चढेल म्हणून थोडक्यात लिहले आहे.



 






Comments

Popular Posts