Temporary Friend

भाग १ - TATA 2 TATA Free

सोशल साईट चा नुकताच उगम झालेला, CDMA मोबाईलच्या युगाला सुरवात होत होती, स्वस्त दरात मोबाईल, इनकमिंग कॉल फ्री, अनलिमिटेड SMS आणि  फ्री कॉल्स (On Same नेटवर्क ) रिलायन्स आणि टाटा CDMA मोबाईलचा धमाका चालू झाला होता. त्याने सुद्धा एक टाटाचा मोबाईल विकत घेतला, मग काय!  चालू त्याचे SMS-SMS खेळणे (त्या वेळेस दिवसाला १०० SMS असे काही लिमीट नव्हते) त्यामुळे भरपूर साऱ्या शायरी इनबॉक्स मध्ये जमा झालेल्या असायच्या.

जास्त फोन तर कॉल सेंटर मधूनच येत असत. लोन हवे आहे का ? नवीन प्लॅन हवा आहे का ? एके दिवशी असाच कॉल आला असता. आवाज अगदीच मधूर दुसऱ्या बाजूला मुलगी होती.

ती: सर तुम्हांला लोन हवे आहे का ?
तो:  मॅडम, तुम्हांला हवे असेल तर सांगा मी देतो लोन. (नेहमीचीच सवय उत्तर द्यायची)
ती: हाहाहाहा हसण्याचा आवाज आला. सर तुम्हीं बिझनेस करता का ?  (कॉल रेकॉर्ड होत नव्हते का ? त्यावेळेस )
तो: हो पैसे वाटायचा. (फोन पलीकडून हसण्याचा आवाज आला)
ती: सर घ्याना लोन , गाडी साठी , गर्लफ्रेंडसाठी घ्या काहीतरी गिफ्ट ( हे ऐकून तो खिदी खिदी हसायला लागला)
तो: गर्लफ्रेंड नाही आहे ग ! मला . तुझा आवाज छान आहे हा !!
ती : थँक्यू सर,
तो: तुझे नाव सांग,
ती: नीता !
तो: खरे वाले सांग.
ती: सर खरे नाव सांगायची परमिशन नाही.
तो: तुला ह्या नंबर वर कॉल करू शकतो का ? (१० डिजिट नंबर होता म्हणून विचारले होते )
ती : नाही लागणार सर, लँडलाईन आहे. पण तुम्ही SMS करू शकता.
तो: पण १० डिजिट नंबर आला आहे. ठीक आहे मी
SMS करीन, आता मला जायचे आहे. बाय !
ती : बाय !

दुसऱ्या दिवशी त्याने तिला एक सुंदर शायरी पाठवली. तिचा कॉल आला. थोडावेळ गप्पा झाल्यानंतर, ती म्हणाली मी एक गाणे ऐकवते तुला. त्याने होकार दिला आणि ती सुरु झाली
.

जब कोई बात बिगड़ जाये, जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज
ना कोई हैं, ना कोई था, जिन्दगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज  ............. 

तो थक्क झाला इतका मधुर आवाज ऐकून, त्याने तिला परत एकदा ऐकवं ना ! असे संगितले असता. तिने नकार दिला उद्या कॉल करते आणि ऐकवते.

आता ह्या पुढे रोज फोन आणि रोज तेच गाणे ऐकायला मिळत असत. पण त्यांची कधी भेट होऊ शकली नाही. अधून मधून ती कॉल करत असायची. पुढे जाऊन CDMA मोबाईल बंद झाली आणि मैत्री सुद्धा बंद झाली. 


सोबत फक्त थोड्या आठवणी आणि मधुर आवाजातील ते गाण्याचे बोल राहिलेत. 

Comments

Popular Posts