Orkut ची फ्रेंड जेव्हा FB वर सापडते !

२००८ किंवा २००९ ला ऑर्कुट नावाच्या सोशल (बरंच काही सोसावं लागत असे ) साईटवर मी तिला फ्रेंड request पाठवली. तीन सुद्धा पटकन स्वीकारली (कदाचित त्या वेळेच्या प्रोफाईल फोटो मध्ये मी बरा दिसत असेन). दुसऱ्या दिवसापासून संभाषणला (Chating )सुरवात झाली. जसे इतर नवीन फ्रेंड्स बरोबर पहिल्यांदा बोलतो, तसेच बोलणं सुरु झाले. (त्या वेळेस "hmm" शब्दाचा वापर होत नव्हता.) तिचा एकच फोटो होता ऑर्कुटवर ,दिसायला सुंदर पण त्यावेळेस १३ मेगा पिक्सेल चे कॅमेरा नसल्यामुळे फोटो साधारणता बरे येत असे. आता सारखे Beauty अँप्स उपलब्ध नव्हते. (काळा सुद्धा गोरा दिसतो). तीच आणि माझं बोलणं सुरु झाले.
Hi, How are you? , J1 zhale kaa ? itke common  बोलणे झाल्यावर काय करतोस ?, कुठे राहतोस ?  हेय सुद्धा बोलून झाले. पहिल्याच दिवशी मुलगी इतकी बोलते म्हंटल्यावर मनात थोडी शंका येत होती, त्यात एकच फोटो असल्यामुळे शंका अजून वाढत होती. पुढं तीन मुलींचा एक ठरलेला प्रश्न विचारला "hobbies" काय तुझ्या ? (मी मनातल्या मनात एक असेल तर सांगेन ना !)
मी : असं सगळ्या सांगता येत नाही ग !
ती:  ठीक आहे !  आवडता रंग (colour ) कोणता तुझा ?
मी: काळा आणि सफेद (मुळात हे दोन्ही रंग नव्हेच). तुझा ? (मुलं अशीच मुलींनी विचारलेला प्रश्न शॉर्टकट मध्ये विचारतात).तिने काय उत्तर दिले, ते आता मला आठवत नाही.
त्या नंतर परत तिने विचारले. खायला काय आवडते ?
मी: पाणीपुरी (साधारणता सर्व मुलींना पाणीपुरी आवडत असते) .
ती : (पटकन ) मला सुद्धा !
सेकंदाचा ही विलंब न करता मी रिप्लाय केला. कधी येऊ मग खायला ?
ती : ये ना ! उद्या
माझ्या मनात परत एक शंका आली खरंच ही मुलगी आहे ना ?
मी: उद्या नाही परवा येतो (शनिवार ची सुट्टी असते ना मला )
ती : चालेल ये !  घाटकोपरला.
मग लगेच त्या दिवशी मोबाईल नंबर मिळाला (नंबर मिळवण्यासाठी जास्त कष्ट करावे नाही लागले). नंबर exchange करण्यात आले. माझ्याजवळं टाटा चा मोबाईल आणि बहुतेक तिच्या जवळही त्यामुळे SMS आणि कॉल ही फ्री होता. हवं तेवढं बोलता येणार होत. मोबाईल नंबर मिळाल्यावर शंका नाहीशी झाली. रात्री कॉल करून बोलणे झाले आणि sms sms खेळणं सुद्धा चालू झाले.(तेव्हा WhatsApp जन्म भारतात तरी झाला नव्हता)
    शनिवारी संध्याकाळी मी घाटकोपरला पोहचलो थोडी मनात भीती, कारण लगेच भेटणं ठरलं होत. घाटकोपरला पोहचता मी तिला कॉल केला. तर ती म्हणाली मी येते १० मिनिटात (आपल्याला कोणी तरी गंडवले असे मनात येऊन गेले ) तू "भारत कॅफे" (घाटकोपर ईस्टला गेलेल्या सर्वांना परिचित असलेली जागा ) च्या इथे उभा रहा. मी मुद्दामून विरुद्ध जागेवर उभा राहिलो. १० मिनिटानंतर माझा फोन वाजला. (तिचे नाव वाचून चेहर्यावर स्माईल आली होती )
ती: अरे कुठे आहेस तू ?
मी: भारत कॅफे जवळ
ती : मी पोहोचतंय तिथं !
मी रस्ता क्रॉस करत फोन वर बोलत तिच्या समोर गेलो. आणि तिच्याकडे पाहतच राहिलो फोटो जितकी छान दिसत होती त्या पेक्षा अधिकच ती सुंदर मी तिला म्हंटले फोटोपेक्षा खूपच सुंदर आहेस आणि ती म्हणाली तु  फोटोत खूप चापटर वाटतोस. (दुसऱ्यांदा मला हे ऐकायला मिळाले होते. पहिल्यांदा जी म्हणाली ती नक्कीच वाचेल हे )
मी: त्त्वरित रिप्लाय दिला (ह्यात मी हुशार आहे ).
फोटोत ना ! रिअलमध्ये तर नाही.
ती: हसली.
भारत कॅफे मध्ये आम्ही sandwitch  खाल्ले.
मी : पण, आपण पाणीपुरी खायला भेटलो होतो ना ? (मुळात मला लवकर तिथून निघायचे नव्हते)
ती: ठीक आहे ! आपण थोडं फिरू आणि मग पाणीपुरी खाऊ.
ती मला एका मंदिरात घेऊन गेली सुरवातीला एक भव्य मोठी गौतम बुद्धांची मूर्ती, मी काही म्हणायच्या आताच ती म्हणाली अजून आत मध्ये बरेंच देवांच्या मुर्त्या आहेत. हो आणि खरंच आत मध्ये गेल्यावर शंकराची सुद्धा भव्य मूर्ती होती. तिथे थोड्याश्या गप्पा झाल्यावर पाणीपुरी खायला गेलो पाणीपुरी चे पैसे सुद्धा तिनेच दिले कारण तिने मला बोलावले होते तुझे म्हणणे होते. पुढे अशीच मैत्री चालू राहिली बरच बोलणं व्हायचे फोन आणि sms वर आणि एकदिवशी ती अचानक गायब झाली. फोन बंद ऑर्कुट बंद काहीच कॉन्टॅक्ट नाही. मी सुरवातीला बरच शोधलं mutual फ्रेंड्स ना विचारले त्यांनी सांगितले ती गावी निघून गेली तिचा काही कॉन्टॅक्ट नाही. आम्ही नेहमीच बोलायचो फोन वर बरं वाटायचं तिझ्याशी बोलून. पण अचानक ती काहीही न सांगता गायब झाली.
सुरवातील मी शोधलं तिला फेसबुक वर पण काहीच थांग पत्ता नाही.
काल अचानक तिची आठवण झाली आणि पुन्हा एकदा search केले फेसबुक वर तिचे नाव आठवत होते पण आडनाव नीटशे आठवत नव्हते. search केल्या केल्या तिझा फोटो दिसला. म्हंटल हि तीच आहे ह्या वेळेस मात्र बरेचं फोटो होते तिझे. तिने आताही लगेच फ्रेंड request accept केली. आणि लगेच आम्ही बोलू लागलो तिला सुद्धा मी लक्षात होतो म्हणजे तर आणि आम्ही भेटलो होतो एकदा घाटकोपरला हे सुद्धा माहीत होते.

मी: कुठे गायब झाली होतीस ?
लग्न झाले का ?
किती मुलं आहेत ?
ती : Oyy wait wait , १ वर्ष झाले लग्नाला. लगेच कुठे.
मी: पाणीपुरी आवडते ना अजूनही कि आता आवड बद्दली ?
ती : हसून (smiley),  नाही आवडत आता पाणीपुरी
मी: हाहाहाहा....
ती: कसला सॉलिड आहेस रे तू ...... तूझ्या अजून लक्षात आहे.
एक विचारू , इतकी वर्ष मी कशी लक्षात राहिली तुझ्या.
मी: माझी मेमरी स्ट्रॉंग आहे. हाहाहाहाहा
 
आज ही तिच्याशी बोलून बरं वाटले मला तर खूप बोलायचं होत. घरीच बरी काम असल्यामुळे तिला जसा वेळ मिळेल तसं बोलणं झालं.ऑर्कुट वर हरवलेली मैत्रिण फेसबुक वर सापडल्यावर आणि तिला ही माझे नाव वाचल्यावर लगेच आठवल्यामुळे पुन्हा एकदा सोशल साईटवर हरवलेली मैत्री सुरु झाली.
Nice to talk with you.

Comments

Post a Comment

Popular Posts