गोष्ट तिच्या भेटीची

गोष्ट तिच्या भेटीची 

अधूनमधून भेटीगाठी होत असतात पण ही भेट खास होती, कारण १५ वर्षांमध्ये प्रथमच तिने भेटूया का ? असं विचारलं होत (हो हो आहे एवढी जुनी मैत्रीण ) ह्या आधी नेहमीच मी विचारलेले होते. तिने विचारलं स्वतःहून ह्यातच सगळं आलं होत त्यात सुद्धा तिने सांगितले सुट्टीच्या दिवशी भेटू मस्त लंच करू आणि तू नको येउ इकडे मीच येते तुझ्या इथे. सगळं १५ वर्षातील एकदम भरून काढायचं ठरवलं होत वाटतं. हिला भेटताना कधी कपडे नीट नेटके आहेत ह्याचा विचार केला नाही (कधी कधी तर स्लीपर घालून दाट वाढलेले केस अश्या भयंकर अवतारात सुद्धा गेलो आहे )

पण ह्या वेळी विचार करावा लागत होता, कोणते कपडे घालू , शूज घालू कि सॅंडल, गॉगल सुद्धा सोबत घेऊया  वारंवार तिला मेसेज करत होतो नक्की कित्ती वाजता भेटायच, कुठे भेटायचं  जणू काही पहिलीच भेट आहे. ती अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत सांगते मी तुला असंच बोलत राहिली. भेटायचा दिवस उजाडला मी तिला म्हणालो होतो घरातून निघालीस कि मेसेज कर , पण सांगून ऐकणारी ती कसली, ठरलेली वेळ निघून गेली होती.  मी घरी जेवण नको सांगून बसलो होतो. म्हंटल आज फजिती होते आहे. 

आता तिला वेळ मिळाला मोबाईल बघायला 

ती:  मी निघाली आहे ट्रेन मध्ये आहे पोचेन १५ मिनिटात .  

मी : तुला बोलो होतो घरातून निघाल्यावर मेसेज कर 

ती : तू ये आता लवकर (हे बरं उशीर हिच्यामुळे झाला आणि मलाच लवकर येत आहे)

आणि ऐक बांद्रा नको दादरला भेटू ! दादरला कुठे येऊ ते सांग ? 

मी कसला रिप्लाय देतो मी तयारीला लागलो , आता कसला शर्ट आणि गॉगल हातात सापडला तो शर्ट घातला आणि निघालो. नशीब म्हणजे स्कुटर मधून हेल्मेट काढला आणि गॉगल सापडला. आता मला वेळ मिळाला मोबाईल बघायला. मेसेज केला दादर वेस्टला ये. 

दादर वेस्टला पोहचलो विसावा हॉटेलच्या opposite बाजूला वाट पाहत राहिलो (मुलींची पंधरा मिनिट म्हणजे )

पुन्हा मेसेज केला कुठे पोहचलीस 

ती:  दादर   

मी : ठीक आहे.  किती उशीर !

ती : हो रे ! उशीर झाला , मला खूप भूक लागलीय !  आधी जेवूया !!

मी: ठीक आहे विसावा हॉटेलच्या इथे ये ! (बरं आता हिचा समज काय , मी हॉटेल सुद्धा शोधून ठेवलंय )   

माझी नजर त्याच रस्त्यावर लागून राहिलेली आणि नेहेमीची सवय तिला लांबून येतानाच ओळखायची. माझ्या दृष्टीस पडली ती , तिला अजून मी दिसलो नव्हतो तिच्या पोटात कावळे ओरडत होते ! सुंदर तर ती आहेच त्यामुळे ती सुंदर दिसत होती हे म्हणणं काही विशेष वाटत नाही. मी टीशर्ट जीन्सवर येईल असा अंदाज बांधला होता कारण ह्या आधीच्या भेटी मध्ये हाच तिझा ड्रेसकोड पण आज ती पंजाबी सूट मध्ये आली होती. लांबूनच तिला पाहिल्यावर माझ्या चेहऱ्यावर गोडशी स्माईल आली होती (तिचे प्रत्यक्ष दर्शन , तिचा फोटो किंवा तिचा मेसेज आला कि आपोआपच स्माईल येते) ती आली विसावा हॉटेल जवळ, मान वर करून हॉटेलचा बोर्ड बघितला आणि मग इकडे तिकडे मी कुठे आहे ते शोधत राहिली , १० सेकंद मी मजा पाहत राहिलो. (१० सेकंद खूप असतात हे व्हिडीओ पाहताना येणाऱ्या ad वरून समजून घ्या) मग फोन केला.

मी: पागल कुठे आहेस ? 

ती: मी आली विसावा हॉटेल जवळ ! 

मी : मी तिला पाहत होतो तिने अजून मला पहिले नव्हते.  

हसलो  जोराने आणि म्हणालो मागे पहा वळून वेडे (ती विसावा हॉटेलकडे तोंड करून उभी होती. )

मागे वळून पहिले आणि तिने जी स्माईल दिली ती अगदी तशीच होती जेव्हा मी तिला गर्दीत पाहिल्यावर दिली होती. बऱ्याच दिवसांनी भेटत होतो त्यामुळे दोघांना हि आनंद होता. 

रस्ता क्रॉस करून आली ! आणि म्हणाली चल लवकर खूप भूक लागली आहे सकाळपासून काही खाल्लं नाही. 

तुला येते ना चालवता ? बसू ना मी ? सांभाळून नेशील ना ! 

एकदा सुरु झाली की थांबायचं नाव नाही ! मी म्हंटल बस तू आधी ! 

आणि निघालो  

मि: कुठे जायचं जेवायला ? काय खाणार आहेस ?  

ती: कुठे पण चल , पण लवकर 

म्हंटल ovenfresh मध्ये जाऊया छान पिझा , पास्ता खाऊया 

ती: ये बाबा ! ते तुझं पिझा पास्ता नको रे बाबा ! दुसरं बघ कुठलं तरी 

लवकर पण जायचं आणि हे नको आणि ते नको भूक लागलेल्या माणसाची चिडचिड व्हायची. 

बाजूला असलेल्या GoldRush हॉटेल मध्ये जाऊन बसलो ! 

बघ म्हटलं मागव काय तुला हवे ते 

एक स्टार्टर मागवलं त्यातलं थोड्स खाल्लं आणि प्लेट माझ्या पुढे सरकवून आता तूस संपव !  खाता खाता निवांत गप्पा चालू होत्या. पोटात थोडं गेल्यावर चिडचिड कमी होऊन चेहरा हासरा झाला होता. 

मी:  रोटी मागुया का  ? 
ती: नको ! नको ! पालक खिचडी मागव (मी ह्या आधी कधी खाल्ली नव्हती ) पण आता तिने मागवलं तर खावं तर लागणार होते. 

चांगली होती पालख खिचडी 

ती : ताक पिणार तू ? 

मी हो म्हंटल ! 

ती: मागव मग दोन ! 

मी: जेवल्या नंतर मागुया 

ती: नको सोबतच मागव लवकर ! 

मी दिला आवाज वो दोन ताक द्या लवकर !  त्यावर मला ओरडते असं कोण मोठ्याने बोलतो का !  हॉटेल मध्ये सिरीयस बसलेले सगळे लोक हसायला लागले. (लोकांना हसवणं तर आपलं काम आहे) 

मॅडम अजून काय मागवू का तुम्हांला स्वीट्स मध्ये , ती म्हणाली आईस्क्रिम खाऊया पण त्यांच्याकडे आईस्क्रिम  नव्हतं. 

मी म्हंटल बिल द्या , बिल आल्यावर तीन लगेच पॉकेट काढलं (माझ्या लाडक्या मैत्रिणी आहेच दिलदार ). मी देतो बिल तू राहूदे . 

ती: मी देते रे बिल मला सवय आहे . 

मी: गमतीने म्हणालो , पगार वाढलाय वाटते. 

ती : ती हळू आवाजात मग तुला बोली ना वाढवला माझा पगार आता ! 

मी : बर किती वाढवला आहे असा ! 

ती : हळूच पुढे येऊन म्हणते ५०००० केला आहे. 

मी: मुद्दामून ! मोठ्याने बोललो खरच वाढवला ? ५०००० केला ? मग तर माझ्या पेक्षा जास्त आहे तुला पगार तरी पण मी बिल भरतो नंतर बघू कधी तर भर  (बाजूचा मुलगा सुद्धा ऐकून हसू लागला )

ती : (माझी भोळी मैत्रीण) अरे खरंच वाढवला आहे ! 

म्हंटल राहूदे !! नंतर कधी तरी दे तू बिल, 

तिथून पुढे फिरायला  निघालो , मग एका ठिकाणी बसून थोड्या गप्पा मारल्या, ती समोर असते तेव्हा बोलण्यापेक्षा तिला पाह्ण्यातच जास्त वेळ जातो. आहेच फार सुदंर ते सुद्धा without makeup  (मला तर नेहमीच सुंदर दिसते ती) सेल्फी सुद्धा घेतले पण तिची परमिशन नसल्यामुळॆ फोटो नाही पोस्ट करू शकत.  

साधीभोळी माझी मैत्रीण ५०००० पगार सांगताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला एक वेगळंच समाधान मिळत होत. इतरांशी फटकळ बोलणारी, माझ्या सोबत अगदीच भोळी असते. मी मेसेज नाही केला तर स्वतःहून मेसेज करते, तिच्या आयुष्यातील सुख दुःख सगळंच share करते, बोलतो,भांडतो, फोनवर तासंतास गप्पा हाणतो, कित्येकदा भेटलो आहे, तरी सुद्धा प्रत्येक नवीन भेट हि पाहिल्याभेटीसारखी असते. इतक्या वर्षाची मैत्री असूनही आमची भेट अनोळख्या सारखीच असते. खूप त्रास देतो मी तिला ती मात्र नेहमीच माझं ऐकून घेते. दोन चार दिवस busy असेन तर मेसेज करेल. रागवला आहेस का ?  

अश्या गोड मैत्रिणीने ,मला पाहिल्यावर तिने दिलेली स्माईल आणि पुन्हा पुढच्या भेटीची आतुरता घेऊन मी घरी निघालो.    

    

Comments

Popular Posts