नरीमानपॉईंटचा सनसेट

 ती म्हणाली शनिवारी भेटू नरीमानपॉईंटला आणि  सनसेट ( सूर्यास्त ) पाहू , सनसेटची वेळ चुकवू नकोस, पण काय नशीब, आठवडाभर चाललेल्या विचारांच्या देवाणघेवी नंतर,आमच्या विचारांचा सनसेट झाला. पदरात निराशा आली.  कधी कधी आत्मसन्माना  खातीर काही निर्णय घ्यावे लागतात. थोडंसं नैराश्य तर येते (मूड खराब वाला टाइम) म्हंटल मित्राशी शेअर करूया तर मित्र म्हणतो चल बसुया !  भावा हे एकच औषध नाही  नैराश्यावर . 

उद्या वर्ल्ड सायकल दिवस आहे , जातो नरीमानपॉईंटला सूर्योदय पाहतो, लागलीच मित्रा कडून पंप घेऊन हवा भरली सायकल तयार केली. चा 

काल अगदी म्हंटल जाऊ नरीमनपॉईंटला, पण रविवारचा दिवस होता सकाळी उठल्यावर जो आळस भरला होता.त्यात खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर आकाशात सुद्धा काळे ढग भरलेले जणू देवाने सुद्धा ठरवले होते ह्याला सूर्योदय काही पाहू द्यायचा नाही म्हणून त्यांनी सुद्धा नैराश्यानंतर जसा आयुष्यात अंधार येतो तसा अंधार करून ठेवला होता. तरी म्हंटल जाऊया उजाडेल आपल्याला निदान सूर्याचे तरी दर्शन होईल. 

आळस दूर करण्यासाठी हेडफोन घेतले म्हंटल गाणी ऐकत जाऊ मोबाईल काढला बॅटरी २५% फक्त , आज सगळंच आपल्या विरोधात आहे तरी सुद्धा पेडल मारला निघालो सरळ वरळीमार्गे , रिमझिम पाऊस, ओले सफेद फेसाळलेले रस्ते (ऑइल मुळे) अधीमधी चिखलानी माखलेले , मधेच अंगार उडणारे चिखलाचे टिफके आणि थंडगार हवा रविवार असल्यामुळे गाड्यांची वर्दळ कमी हेडफोन नाही म्हणून चिंब भिजलेले रूप सजलेले बरसोनि आले हे गाणं गुणगुणत आपला प्रवास सुरु ठेवला ,

मग मनात विचार आला पेडर रोडची टेकडी चढायला जमेल का ? कि हाजीअली वरून परत फिरुया , एक मन हो म्हणतंय एक मन नाही. पण आपल्याला नैराश्यांतून बाहेर पडायला नारीमानपॉईंटला जाऊन सूर्य पाहायचा आहे, मग काय धरला पुन्हा वेग आता ठरलं थेट नरीमानपॉईंट, वरून देवाने काळे ढग नाही हटवले , सूर्य नाही दिसला तरी आपण ह्या गारव्यातून , उडणाऱ्या चिखलातून नरीमानपॉईंट गाठायचे, अगदीच सहज पेडररोड टेकडी पार केली. 

आणि मग काय आळस कुठल्या कुठे निघून गेला उतरणारा जो सायकलचा वेग असतो , झपाझप फिरणाऱ्या टायर्सचा आवाज मनात एक वेगळी चेतना आणतो (असाच आळस झटकुन वेग पकडला कि जगण्याची नवीन चेतना मिळते) टेकडीउतरून उजव्या हाताला वळून सायकलवरुनच बाबुलनाथसमोर नस्तमस्तक होऊन "जय महादेव " म्हणत गिरगाव चौपाटीकडे प्रस्थान केले. आता रुंद आणि मोकळा रस्ता त्यातून त्या सनसेटचा  विसरलं पडलेला हीच ती वेळ हात सोडून सायकलिंगचा आनंद घ्यायचा.  

queen नेकेलस (समुद किनारा) कोणत्याही ऋतू मध्ये अप्रतिम दिसतो पण पावसात एक वेगळा नजराना असतो. आता सूर्य पाहण्याचे सुद्धा मनातून निघून गेले , हेच वातावरण प्रसन्न वाटू लागले. इतक्या सकाळीही मरीनलाईन्सचा कठडा  भरलेला होता पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर हा चान्स सोडत नाही. ह्या प्रसन्न वातावरणामुळं जोश आणखीन वाढला मग काय नरीमनपॉईंटकडे दुर्लक्ष कडून डाव्याहाताकडे मंत्रालयाकडे वळून स्वारी गेटवेला निघाली अफाट गर्दी तिथेही. 

 चिंब भिजलेला गेटवे ऑफ भारत (मुद्दामून भारत लिहलेले आहे ) ताज हॉटेल आकाशात उडणारा कबुतरांचा थवा अथांग सागर, त्यात लाटेवर हलणारी छोटी मोठी जहाज माझ्या डोळ्यांनी हे चित्र रेखाटले होते. आता ते सनसेटचे नैराश्य त्या सम्रुद्रात खोल बुडाले होते. मोबाईल काढला starva app पाहिले ३८ मिनिटात लोअरपरळ ते गेटवे ऑफ भारत (इंडिया) हा पल्ला गाठला होता.  तिथे एक सायकलचा ग्रुप होता चलो चलो करत होते , मी पाण्याचे दोन घोट घेतले व म्हणालो चलो भाई चलो आणि नरीमनपॉईंटला दिशेला वेगाने निघून गेलो. पॉईंटला नेहमीच्या जागी सायकल लावली दोन्ही पाय खाली स्वतःशी हसत पाऊस आणि समुद्राचा आनंद घेऊ लागलॊ. 

सकाळी निघताना सूर्योदय पाहण्याच्या निश्चयामुळे जे काळेढग नकोसे वाटत होते तेच ढग आता चांगले वाटू लागले होते. कदाचित उन्ह असते तर एवढा पल्ला गाठता आला नसता, पाऊस, गारवा ह्यामुळे जी प्रसन्नता होती ती सुद्धा मिळाली नसती. नैराश्याच्या अधीन न जाता परिस्थिती कितीही विरोधात असली तरी त्यावर मात करण्यासाठी आपल्या घरा बाहेर पडावेच लागेल, कधी कधी सुरवातीला आपल्याला नकोशी वाटत असलेली परिस्थिती आपल्या तीच योग्य वाटू लागते म्हणून परस्थिती कशी असलेली तरी मागे फिरायचे नाही, पर्यन्त करायचे देवाने योग्य तो मार्ग बनवूनच ठेवलेला असतो आपण तिथे पोहचण्याआधी मागे फिरायचे नाही. 

नैराश्याच्या अधीन न जाता , त्यातून बाहेर पाडण्यासाठी चुकीचा मार्ग (चला बसुया ) न स्विकारता , काळ्या ढगांमुळे अंधारमय झाले असले तरी आपण सूर्योदयाच्या शोधात निघायचे प्रत्येक सनसेट नंतर सूर्योदय होणारच आणि त्यावेळी आपल्या आयुष्यतील अंधार नक्कीच नाहीसा होईल. कधी कधी पावसाळी वातावरणामुळे , ग्रहणामुळे सूर्यकिरण लपवून राहतील पण जास्त काळ नाही. हा काळ कठीण असेल पण तुम्ही मात्र सूर्योदयाच्या शोधात रहा. एक दिवस नक्कीच तुमच जीवन प्रकाशमय होईल. 

घरी पोहचल्यावर टीशर्ट पाहिले, चिखलाच्या टिपक्यानी भरलेले होते पण  कुछ दाग अच्छे होते है

       

          




 



 

  

Comments

Popular Posts